एक नोव्हेंबरला भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करणार

"सेलिब्रिटी ही सरकारची प्राथमिता आहे, त्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहोत." - केशव उपाध्ये
एक नोव्हेंबरला भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करणार
एक नोव्हेंबरला भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करणारSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: अतिृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. या संकटात राज्य सरकार मदत करत नाही, दिवाळी आली तरी पंचनामे झाले नसल्याने तुटपुंजी असलेली सरकारी मदत मिळत नाही, त्यामुळं येत्या एक तारखेला एक लाख भाजप कार्यकर्ते राज्यात काळ्या फिती लावून फिरणार आहेत आणि सरकारला जागं करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची यांनी दिली आहे. (On November 1, one lakh BJP workers will protest the government by wearing black ribbon)

हे देखील पहा -

आपल्या पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये म्हणाले की, कोकणातील वादळग्रस्त आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारला वेळ नाही, मात्र एखाद्या सेलिब्रेटीसाठी सरकारमधले मंत्री आपली कारकिर्द पणाला लावत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, महिला अत्याचार, पुरग्रस्तांच्या समस्या, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा निषेध करत आहोत, त्यासाठी एक तारखेला भाजपचे एक लाख कार्यकर्ते राज्यभरात काळ्या फिती बांधून दिवसभर फिरतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. सोबतच राज्य सरकारने पोलिसांना ७५० रुपये जाहिर करुन पोलिसांची क्रुर चेष्ठा केली आहे असंही ते म्हणाले.

एक नोव्हेंबरला भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करणार
शहादा शहरात 'माझी वसुंधरा' उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान...

पुढे ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्याला धतुरा मिळाला आहे. खंडणी आणि टक्केवारी सुरू आहे. सेलिब्रिटी ही सरकारची प्राथमिता आहे, त्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहोत. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राज्यभर आंदोलन सुरू करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com