पुण्यात ओला कंपनीच्या ई-स्कूटरला आग; पहा व्हिडिओ

ओलामध्ये वाहनांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही ही घटना गांभीर्याने हाताळू आणि योग्य ती कारवाई करू. असे ओलाच्या निवेदनात म्हटले आहे.
Ola E-Bike Fire
Ola E-Bike FireSaam Tv
Published On

पुणे - शहरातील धानोरी परिसरात काल दुपारी एकच्या सुमारास ओला एस१ ईव्ही स्कूटरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही स्कूटर जिथे पार्क केली होती ते दुकान असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडिओ शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसत आहे, ज्यामधून धूर आणि जाळ निघताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओला कंपनीने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे.

आग नेमकं कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळी व संध्याकाळी हा रस्ता गजबजलेला असतो मात्र दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ओलाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर यामागचे कारण शोधले जात असून लवकरच माहिती सार्वजनिक केली जाईल.
या घटनेनंतर ओएलएचे म्हणणे आहे की, ओलामध्ये वाहनांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही ही घटना गांभीर्याने हाताळू आणि योग्य ती कारवाई करू.असे ओलाच्या निवेदनात म्हटले आहे. लिथियम-आयन बॅटरीचे नुकसान किंवा शॉर्ट सर्किटमुळे असे घडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

Edited By- Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com