पुणे : पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाने वेगळे वळण धारण केले. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने अचानकपणे हे आरोप मागे घेत तक्रारही मागे घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात पीडित तरुणीच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी कुचिकांवर अत्यंत धारदार स्वरूपात शाब्दिक वार अथवा आरोप केले होते.
हे देखील पहा :
पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करत सदर प्रकरणात चित्रा वाघ यांनीच रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात जबरदस्ती पोलीस तक्रार दाखल करण्यास व जबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. तरुणीच्या या आरोपानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी मला सुसाईड नोट लिहण्यासाठी चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला. तसेच मला तक्रार दाखल करायची नव्हती , पण जबरदस्तीमुळे हि तक्रार दाखल केल्याचेही पीडित तरुणीने स्पष्ट केले.
ह्या सर्व घडामोडींनंतर चित्रा वाघ यांनी मंगळवारी (१२ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन तरुणीच्या या सर्व आरोपांचे खंडन केले. तसेच माझ्या जीवनातील हा एक वाईट अनुभव असून सदर पीडिता हे सर्व कश्यासाठी अथवा दबावापोटी करत आहे का? अशी टिपण्णीही वाघ यांनी केली होती.
दरम्यान, या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांनी पुण्यातील प्रसिद्ध वकील हर्षद निंबाळकर यांच्या मार्फत चित्रा वाघ यांना दहा कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्याबाबत नोटीस पाठवली आहे. वाघ यांनी पीडित मुलीला बळजबरीने कुचिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. तसेच नुकतेच संबंधित पीडितेने चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरूनच कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे म्हटले होते. तर मीडिया ट्रायल घेताना वाघ यांनी कुचिक यांच्यावर नराधम, बलात्कारी, थेरडा असा एकेरी उल्लेख करत त्यांची समाजमनात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. या अनुषंगाने वाघ यांच्या विरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.