महागाईचा परिणाम; २९ टक्के भारतीय वळले कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे!

विशेष म्हणजे यात केवळ अल्प उत्पन्न गटातीलच नाही तर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचाही समावेश आहे.
Inflation
Inflation SaamTvNews
Published On

नागपूर : वाढत्या महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत. महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे 29 टक्के भारतीय कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे (Edible Oil) वळल्याचं एका निष्कर्षात पुढं आलंय. विशेष म्हणजे यात केवळ अल्प उत्पन्न गटातीलच नाही तर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचाही समावेश आहे.

हे देखील पहा :

भारतीयांच्या आहारात खाद्यतेलाचं महत्त्व आहे. तेलाशिवाय स्वयंपाकघर अर्थवटचं मानलं जातं. मात्र, खाद्यतेलाचे दर सहा महिन्यात दुप्पट झाले. त्यामुळं सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट (Budget) कोलमडले आहे. परिणामी अनेकांनी ब्रॅण्डेड तेलाऐवजी कमी दर्जाचे तेल वापरणं सुरू केलंय. लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढं आलीय. देशभरातील 356 जिल्ह्यातील 36 हजाराहून अधिक नागरिक यात सहभागी झाले होते.

Inflation
नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Y Plus सुरक्षा!
Inflation
जिंतूरमध्ये जिलेटीन कांड्यांचा भीषण स्फोट; दोन बालक गंभीर जखमी!

या सर्वेक्षणात तेल महागल्याने 24 टक्के लोकांनी तेलाचा वापर कमी केल्याचं आढळून आलं. तर 67 टक्के लोकांनी इतर खर्चातून बचत करत तेलाचा वापर तेवढाच ठेवला तर 21 टक्के भारतीयांनी कमी दर्जाच्या तेलाची निवड केल्याचं आढळून आलं. मात्र, या कमी दर्जाच्या तेलामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळं खाद्यतेलाचे दर नियंत्रित होणं गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com