राज्यातील सर्व नागरी क्षेत्रातील अकृषिक कर वसुलीला स्थगिती, मात्र मुंबईकरांना सूट नाही

ही रक्कम अवाजवी असल्याने सर्वपक्षीय आमदारांनी त्याला विरोध केला होता
Non-agricultural tax
Non-agricultural taxSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: अकृषिक कर (Non-agricultural tax) वसुलीला राज्यात स्थगिती देण्यात आली आहे. 2001 पासून 2021 पर्यंत थकबाकी आणि चालू अकृषिक कर वसुली सुरु होती. ही रक्कम अवाजवी असल्याने सर्वपक्षीय आमदारांनी याला विरोध केला होता. यामुळे राज्यातील सर्व नागरी क्षेत्रातील अकृषिक कर वसुलीला स्थगिती देण्यात आलीये.

मुंबई उपनगरातही (Mumbai Suburban) अकृषिक कराला स्थगिती देण्यात आलीये. पण हा निर्णय मुंबईल लागू नाही. मुंबईकरांना हा कर भरावाच लागणार आहे.

Non-agricultural tax
Girish Mahajan: आमची खुर्ची फक्त काढू नका, शिवसेनेचं एवढंच धोरण, गिरीश महाजनांचा टोमणा

शेतीच्या जमिनीवरच्या इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. अकृषिक कर (Non-agricultural tax) रद्द करावा अशी आमदारांची मागणी होती. अकृषिक करामुळे इमारतीमधील रहिवाशांवर आर्थिक भर पडतो, त्यामुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.

सभागृहाचा सुर बघून तात्पुरती स्थगिती देतो. मात्र, मुंबई शहराला ही स्थगिती लागू नाही. मुंबई उपनगरात कराला स्थगिती असेल, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

मुंबई उपनगर वासियांवरील आर्थिक बोज्यावर लक्षवेधी

मुंबई उपनगर वासियांवर जो आर्थिक बोजा टाकला त्यावर लक्षवेधी होती. अकृषिक कराला चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी स्थगिती दिली होती. मात्र, या सरकारने 60 लाख इमारतींना व्याज लावून अकृषिक कर लादला. याला तातडीने स्थगिती दिली पाहिजे, अशी आम्ही मागणी केली. त्याला आता महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com