Election Commission News: राज्यात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही; निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण

Election Commission Local Body News: राज्यात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
Election Commission Local Body News
Election Commission Local Body NewsSaam TV
Published On

Election Commission Local Body News: राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका लागण्याची दाट शक्यता असून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. अशा बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांचं राज्य निवडणूक आयोगाने खंडन केलं आहे. राज्यात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Election Commission Local Body News
Sanjay Raut News: शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

निवडणुकांबाबत आयोगाने काय सांगितलं?

राज्य निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही.

शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Local Body Election) सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते, असं मदन यांनी सांगितलं आहे.

Election Commission Local Body News
Maharashtra Politics: आगामी निवडणुका भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार? मुख्यमंत्रीपद कुणाकडे? वाचा...

त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी 1 जुलै 2023 ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना 5 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते.

यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही मदान यांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com