'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल...

वैद्यकीय गटविमा योजनेच्या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का? असा खोचक सवाल त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल...
'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल...Saam Tv News
Published On

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय गटविमा योजनेच्या मुद्द्यावरुन आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का?असा खोचक सवाल त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. आपल्या पत्रात नितेश राणे मुख्यमंत्र्यांना लिहीतात की, ''आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वताच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’ चीही जगभर वाहवा ‘मिळवून’ घेतात.'' अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. (Nitesh Rane has criticized the Chief Minister on the issue of medical group insurance scheme)

हे देखील पहा -

गटविमा योजना पुर्णपणे बंद पाडण्यात आलीये. हे आपणांस माहित नाही का?

पुढे नितेश राणे म्हणतात, ''जे खरे कोविड वॉरीअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पुर्णपणे बंद पाडण्यात आलीये. हे आपणांस माहित नाही का? मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. १ ऑगस्ट २०१५ साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात ०१ऑगस्ट २०१७ ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही.''

त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी खेळू नये

आपल्याला हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये.

'बंद करून दाखवले'चे श्रेय घेणार का? नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल...
ठेकेदाराची एक चूक अन् शेतकऱ्याचं दोन लाखांचं नुकसान

‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?

जेंव्हा ही योजना सुरु केली तेंव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते. आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का? असा खोचक सवाल नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com