Pune ISIS : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात NIA कडून न्यायालयात आरोपपत्र दाखल; केमिकल्ससाठी ठेवले होते कोडवर्ड

Pune ISIS : अतिरेक्यांनी बदला घेण्याचा प्लॅन तयार होता. त्यासाठी त्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडल्याची माहिती एनआयएने दिलीय.
NIA
NIA Saam tv

Pune ISIS :

पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनआयएनं केलेल्या तपासात मॉड्यूलमधील आरोपी दहशतवादी उच्चशिक्षित असल्याचं समोर आलंय. अटकेत असलेल्या आरोपी जुल्फिकारला मल्टी नॅशनल कंपनीत ३१ लाख रुपयांच्या पॅकेजवर कार्यरत असल्याचे तपासात माहिती मिळालीय. (Latest News)

या आरोपींनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. अतिरेक्यांनी बॉम्बची निर्मिती करण्यासाठी काही कोडवर्ड तयार केलं होतं. या प्रकरणात आरोपीवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे.

अतिरेक्यांनी बदला घेण्याचा प्लॅन तयार होता. त्यासाठी त्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडल्याची माहिती एनआयएने दिलीय. आरोपी या प्रशिक्षण केंद्रात जवळील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीची योजना आखत आयईडी स्फोटक बनवत होते. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी पुणे शहरामधील युवकांचं मन परिवर्तन करत. मोहम्मद इमरान, मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका, आमिर अब्दुल हमीद, मोहम्मद युनुस, मोहम्मद याकूब साकी उर्फ आदिल आणि सलीम खान हे तरुणांचं ब्रेन वॉश करत.

अतिरेक्यांनी काही कोडवर्ड तयार केले होते. त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता. अतिरेक्यांनी अनेक राज्यात दहशतवादी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून दुचाकीचा वापर ते करत होते.

NIA
UP ATS Action: पुणे मॉड्यूलशी संबंधित इसिसच्या ४ दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशात अटक, ३ जण आहेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com