मुंबई - पुरावा नष्ठ करण्यासाठीच मनसुख हिरेनची Mansukh Hiren हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या NIA तपासात समोर आली आहे. यासाठी मारेकऱ्यांना ४५ लाख रुपयांची खंडणी दिल्याचा युक्तीवाद एनआयएकडून न्यायालयात करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना एनआयएने अटक केली आहे.
२५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या घराजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली एक स्कार्पिओ कार सापडली होती. मनसुख हिरेन यांच्या मालकीची ही स्कार्पिओ कार होती. स्फोटकांनी भरलेली कार रस्त्यावर आढळल्याने या घटनेचा तपास एनआयएने कडे सोपवण्यात आला. ही जिलेटीन स्फोटकांनी कार मनसुख हिरेन यांच्या नावावर असल्याने हिरेन यांच्या अडचणी वाढल्या होत्या. तसेच त्यांना चौकशीसाठी अनेकदा बोलवण्यात आले होते. त्यामुळे मनसुख हिरेन पूर्णपणे घाबरून गेले होते. मनसुख कुठल्याही क्षणी तोंड उघडू शकतात. हे लक्षात आल्यानंतर मनसुखचा काटा काढायचा कट रचला.
हे देखील पहा -
मनसुख हिरेन यांचा मृतदेह समुद्राच्या खाडीत आढळून आला होता. संबंधित स्कॉर्पिओ आणि पांढरी इनोव्हा गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून सीआययुचे पोलीस असल्याची माहिती एनआयए ने उघड केली होती. एनआयएकडून विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली आहे.
“सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन हत्येमध्ये सहभाग होता यांच्यासोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव हे देखील होते. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट सर्व रचून पुरावे नष्ट केले. हिरेनच्या हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत. प्रदीप शर्मा हे निवृत्त आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर मिळाली आहे. ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे” असे वकिलांकडून कोर्टात सांगण्यात आले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.