नीट वाचता न येणाऱ्यांनी सल्ले देणे बंद करावे; पडळकरांचा रोहित पवारांना टोला (पहा व्हिडिओ)

आपल्या घरगुती वादात इतर पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका
नीट वाचता न येणाऱ्यांनी सल्ले देणे बंद करावे; पडळकरांचा रोहित पवारांना टोला (पहा व्हिडिओ)
नीट वाचता न येणाऱ्यांनी सल्ले देणे बंद करावे; पडळकरांचा रोहित पवारांना टोला (पहा व्हिडिओ)विजय पाटील
Published On

सांगली - एमपीएससी MPSC Exam परीक्षा व नियुक्तीवरून भाजपा आमदार गोपीचंद Gopichand Padalkar पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर NCP सडकून टीका केली आहे. आपल्या घरगूती वादात, दुसऱ्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका. तसेच नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी Rohit Pawar केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे असा टोला आमदार पडळकर यांनी लगावला आहे. ते सांगलीच्या झरे मध्ये बोलत होते.

राज्यातील एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या आणि आयोग सदस्य नेमणूक यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार पडळकर यांनी सडकून टीका केली आहे. आपल्या घरगुती वादात इतर पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका, प्रशासनात आपल्या कुटुंबाची किती वचक आहे असे तुणतुणे वाजवण्यात तुमचे आयुष्य गेले आहे.

या तुणतुणे वाजवण्याच्या नादात दुसऱ्यांचे नुकसान करू नका.एमपीएससी परीक्षा कधी घेणार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी देणार, याचा ताळमेळ नाही. तसेच एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना 31 जुलै आधी याद्या पाठवल्याचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. मात्र आजच राज्यपाल भवन मधून 2 ऑगस्ट रोजी याद्या आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात यावर शिक्कामोर्तब केले आहे.

नीट वाचता न येणाऱ्यांनी सल्ले देणे बंद करावे; पडळकरांचा रोहित पवारांना टोला (पहा व्हिडिओ)
चिमुकलीने वडिलांना लटकलेले पाहिले अन्‌ रडत खाली आली

अजित पवार यांनी सभागृहात एक सांगितले होते आणि बाहेर येऊन दुसरे सांगितले. त्यामुळे पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे.तर रोहित पवार यांना सभागृहामध्ये अटल बिहारी यांची कविता वाचताना,ती नीट वाचता आली नाही त्यामुळे ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेत,असा टोला आमदार रोहित पवार यांना पडळकर यांना लगावला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com