'ही तर नव्या आयुष्याची सुरुवात' NCP शहराध्यक्षांनी दिली त्यांच्या आजाराविषयी माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांना झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. अर्धांगवायूचा झटका (Paralysis) येऊन गेल्याची माहिती जगताप यांनी फेसबुकद्वारे सांगितली.
Prashant Jagtap
Prashant Jagtap saam tv

सचिन जाधव

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फेसबुक लाईव्ह करत त्यांना झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. अर्धांगवायूचा झटका (Paralysis) येऊन गेल्याची माहिती जगताप यांनी फेसबुकद्वारे सांगितली. चेहऱ्यांच्या डाव्या बाजूला हा झटका आला आहे. 'ही तर नव्या आयुष्याची सुरुवात' असंही त्यांनी या फेसबुक लाईव्हदरम्यान सांगितलं. ( NCP Pune city president News In Marathi )

Prashant Jagtap
मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना काय उत्तर देणार; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचा सवाल

जगताप पुढे म्हणाले, 'माझ्या आजाराची माहिती कोणालाच कळाली नव्हती. मी अनेकांना भेटलो, पत्रकारांना भेटलो, कार्यकर्त्यांनाही भेटलो. पण त्यांनाही माझ्या चेहऱ्यात कोणताही बदल जाणवला नाही. मी जेव्हा माझा एक फोटो पाहिला. तेव्हा मला काहीतरी झालंय असं लक्षात आलं. म्हणून, मी डॉक्टरांना भेटायला गेलो असता, त्यांनी मला अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्याचं सांगितलं'. त्यानंतर त्यांनी आता ही नवीन आयुष्याची सुरवात असल्याचं यावेळी जगताप यांनी सांगितल आहे.

Prashant Jagtap
काँग्रेसला 'मोदी फोबिया' झालाय; अमित शहांचा हल्लाबोल

दरम्यान, पुण्यातील (pune) वानवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रशांत जगताप हे सुरवातीला नगरसेवक झाले. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौरपद दिलं. सध्या जगताप हे गेल्या दोन वर्षांपासून हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. शहराध्यक्ष पदावर आल्यानंतर अनेक आंदोलने तसेच शहरातील विविध विषयांवर पालिकेत प्रश्न मांडण्यासाठी जगताप हे नेहमी सक्रिय असत. आज आजाराबद्दल जगताप यांनी फेसबुक लाईव्ह करत माहिती दिली. तसेच जगताप यांनी 'लढेंगे भी...जितेंगे भी...' असं कॅप्शन देखील फेसबुक लाईव्हला दिलं आहे. जगताप यांचं फेसबुक लाईव्ह झाल्यावर त्यांना अनेक कार्यकर्ते, लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com