Nawab Malik News: नवाब मलिकांचा सुप्रीम कोर्टातून जामीन अर्ज मागे; काय आहे कारण? वाचा...

NCP Nawab Malik Withdraws Bail Application: नवाब मलिक यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आता नवाब मलिक यांच्याकडून हा अर्ज मागे घेण्यात आला आहे.
NCP Nawab Malik Withdraws Bail Application
NCP Nawab Malik Withdraws Bail ApplicationSaam TV
Published On

NCP Nawab Malik Withdraws Bail Application: मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरे जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आता नवाब मलिक यांच्याकडून हा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

NCP Nawab Malik Withdraws Bail Application
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरण; मास्टरमाईंड पाशाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

आता नवाब मलिक (Nawab Malik) वैद्यकीय कारणास्तव नव्याने जामीन अर्ज दाखल करणार आहेत. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत जामीन अर्जासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, हा जामीन अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नवाब मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. याआधी नवाब मलिक यांनी कनिष्ठ न्यायालयात या संदर्भातील जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यावेळीही त्यांचा नाकारण्यात आला होता.

NCP Nawab Malik Withdraws Bail Application
Maharashtra Politics: शरद पवार आणि बंडखोर आमदारांमध्ये काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्वाची माहिती

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नवाब मलिक यांना नवी याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. नवाब मलिक यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आम्ही नव्याने आव्हान देऊ इच्छितो. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी दिली आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांनी अंतरिम जामीन मागितला आहे. त्यांची एक किडनी खराब आहे. दुसरी किडनीही फार कमी काम करत आहे. प्रत्येक तपासाणीसाठी न्यायालयाकडून परवानगी मिळण्यासाठी दोन-तीन आठवडे लागतात, अशी बाजू नवाब मलिक यांच्यावतीने वकिल कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com