यंदा वाढदिवस साजरा नकोच! पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करा; अजितदादाचं कार्यकर्त्यांना आवाहन

पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

मुंबई : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा (Farmer) झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी (22 जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. (Ajit Pawar Birthday News)

Ajit Pawar
बळीराजा थांब रे...! कर्जबाजारीपणाला कंटाळून ३८ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज (22 जुलै रोजी) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, असं आवाहन अजितदादांनी केलं होतं. (Ajit Pawar Birthday Latest News)

Ajit Pawar
पुण्यातल्या शिक्षणासाठी लेकराचा हट्ट; 'आईला रडू देऊ नका' म्हणत संपवलं जीवन

त्याचबरोबर गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात, अशा सूचनाही अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. यंदा कोरोनामुळे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते अजितदादांचा वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक आहे.

मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहता यंदाही अजितदादांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.प्रसाद लाड यांनी फडणवीसांना दिल्या खास शुभेच्छा

दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीसांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लाड यांनी फडणवीसांना प्रभू हनुमान यांची संपूर्णपणे एकाच दगडात कोरलेली सुंदर मूर्ती भेट केली. जसा प्रभू विना हनुमान अपूर्ण, तसा मी सुद्धा असं म्हणत प्रसाद लाड यांनी फडणवीसांना खास शुभेच्छा दिल्या.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com