Ajit Pawar : पुन्हा हा विषय वाढवायचा नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम; अजित पवार संतापले

प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केलं होतं. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं होतं. भाजपने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आज अजित पवार यांनी भाजपला चांगलचं सुनावलं आहे. पुणे दौऱ्यावर असतांना अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar
Nandurbar News: सरपंच निवडणुकीनंतर आता उपसरपंच निवडणूक; कार्यक्रम जाहीर

पुन्हा हा विषय वाढवायचा नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत. मात्र राज्यपालांविरोधात कोणी का बोलत नाही असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, हा विषय वाढवण्यात अर्थ नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण नसताना हा वाद पेटवला जात आहे. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते कोण? माफी मागण्या इतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar
Conversion of Religion : देवाची आळंदीत जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाची घटना, तिघांवर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचं जनता स्वागत करेल, असे अजित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com