Ajit Pawar CM Banner: 'माझ्या सासुरवाडीचं प्रेम उतू चाललंय..', भावी मुख्यमंत्री बॅनरबाजीवर अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

Latest News: अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स लावू नका असे आवाहन केले.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री (Maharashtra CM) होत नसतं. पण माझ्या सासुरवाडीच्या लोकांचे खूपच प्रेम उतू चाललंय', अशी मिश्किल टिप्पणी करत अजित पवारांनी केली. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

Ajit Pawar
Maharashtra Unseasonal Rain Update: अवकाळीचा फटका! बीडमध्ये पुरामुळे 10 गावांचा संपर्क तुटला, राज्यात मोठं नुकसान

अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स लावू नका असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्रीपदाचे बॅनर अजिबात लावू नका. पण आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. असे बॅनर लावून कुणी मुख्यमंत्री होत नसतं.'

तसंच, 'मुख्यमंत्री ज्याला व्हायचचंय त्याला 145 ची मॅजिक फिगर गोळा करावी लागते. जी एकनाथराव शिंदे यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन केली म्हणून ते मुख्यमंत्री झाले. कुणालाच वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे अशाप्रकारे मुख्यमंत्री होतील. पण ते झाले.', असे वक्तव्य करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

Ajit Pawar
Sanjay Raut On Barsu Refinery Protest: 'Mr. उदय सामंत, बारसूच्या आजूबाजूच्या जमिनीचे खरे मालक कोण?' राऊतांचा सवाल

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सगळ्यांना आवाहन करेल. तसंच माझ्या सासुरवाडीमध्ये माझ्यावर प्रेम ओतू चाललंय. म्हणून सासुरवाडीच्या सहकाऱ्यांनाही आवाहन करेन की, असं करु नका. हा तुमचा चुकीचा आग्रह आहे. यातून काही होणार नाही. आपआपलं कामं करा. आमदारांची संख्या वाढवा. जिथे जेवढे जास्त आमदार तुमच्या विचारांचे निवडून येतील तिथे तुम्हाला अशी पदं मिळतली. हरकत लागतील. तसेच जर वरिष्ठांनी आशीर्वाद दिले आणि आमदारांनी सिलेक्शन केलं तर तसं होऊ शकेल.', असं देखील अजित पवारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com