Ajit Pawar : राज्यपाल कोश्यारींवर कारवाई व्हायला पाहिजे का? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं म्हटलं आहे.
Ajit Pawar, Bhagat Singh koshyari
Ajit Pawar, Bhagat Singh koshyari Saam TV

Ajit Pawar Latest News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल कोश्यारींवर राज्य सरकारने कारवाई करावी, असा आक्रमक पवित्रा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजितदादांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.  (Latest Marathi News)

Ajit Pawar, Bhagat Singh koshyari
Sanjay Raut : राज्यपाल कोश्यारींबाबत आमची रणनिती तयार, पण.., संजय राऊत काय म्हणाले, वाचा

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार हे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने होत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन कुणीच करू नये', असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर ज्या प्रकारची वक्तव्य मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती करतात. त्यावेळस त्यांना त्या पदावर बसवणाऱ्यांनी समज द्यावी, असं अजितदादांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आता वरिष्ठांना विचार करण्याची वेळ आली आहे. कारण, राज्यातील महत्त्वाचे विषय सोडून ते (राज्यपाल) वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचंही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar, Bhagat Singh koshyari
Sanjay Raut : भाजपचं सावरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल तर.., संजय राऊतांचं थेट चॅलेंज

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतही अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला हव्यात. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे', असं म्हणत अजित पवार यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का लागत नाहीत? एखादा विषय न्यायव्यवस्थेच्या समोर असेल तर त्याचा अंतिम निर्णय न्यायव्यवस्थाच घेते. मात्र, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे लोक असोत, सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे. फेब्रुवारी २२ ला महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका व्हायला हव्या होत्या. आता डिसेंबरमध्ये १० महिने होतील, तरी निवडणुका होत नाहीत, अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com