Sanjay Raut : राज्यपाल कोश्यारींबाबत आमची रणनिती तयार, पण.., संजय राऊत काय म्हणाले, वाचा

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Raut Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut Bhagat Singh KoshyariSaam TV
Published On

Sanjay Raut News : शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान भाजपच्या नेत्यांकडून, राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सुरू आहे. त्यांना (भाजपला) वाटत असेल की हे जे राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने हा विषय सुद्धा आम्ही बाजूला करू, पण विरोधीपक्ष एकत्र आलेला आहे. आमचा अँक्शन प्लॅन तयार आहे, व्यवस्थित हालचाली सुरू आहे. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut Bhagat Singh Koshyari
Sanjay Raut : भाजपचं सावरकरांविषयी एवढं प्रेम उफाळून आलं असेल तर.., संजय राऊतांचं थेट चॅलेंज

छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार हे अजुन हात चोळत कसे बसले आहेत, किती वेळ बसणार आहेत हात चोळत, तोंड शिवून? हे आम्ही पाहतो आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानावर, सरकारमधील मंत्री-आमदार किती दिवस शांत बसणार आहेत. हे आम्हीच नव्हे तर महाराष्ट्र पाहत आहे. किती दिवस शिंदे गटाचे आमदार हात चोळत बसणार आहेत, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला. भाजपच्या नेत्यांकडून, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे आणि हीच मंडळी शहाणपण शिकवत असल्याची सडकून टीका राऊत (Sanjay Raut)  यांनी केली.

Sanjay Raut Bhagat Singh Koshyari
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे लवकरच माजी होणार; सामनातून गुवाहाटी दौऱ्यावर सडकून टीका

छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका लोकभावना आहे. राज्यपालांचे कार्यक्रम उधळून लावणे हा इशारा त्यांनी दिला. ही जनभावना असून महाराष्ट्र अजूनही शांत आहे असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, की 'पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अपमान झाला तेव्हा त्यांनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलण्यात आणि लिखाणात चूक झाली असे लक्षात आल्यानंतरही त्यांनी पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरू यांनी माफी मागितली'.

'मोरारजी देसाई यांचे महाराष्ट्राबाबत काही मतभेद, वादाचे मुद्दे असतील. पण, त्यांच्याकडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य गेल्यानंतर त्यांनीदेखील माफी मागितली होती. पण भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे आणि उलट शहाणपण शिकवत आहेत, हे महाराष्ट्र पाहत असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र संतापला असून असंतोष निर्माण झाला आहे. वेळ आल्यावर याची प्रचिती दिसून येईल', असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com