मुंबई: नवाब मलिकांच्या (Nawab Malik) पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडाली. ज्यांनी अरबाजला अटक केली ते मनिश भानुशाली (Manish Bhanushali) यांनी साम टीव्ही वर त्यांचं मत मांडलं. बोलताना ते म्हणाले ''मी देशासाठी हे काम केलं आहे. मला माझ्या मित्राने पार्टीबाबत माहिती दिली तिच माहिती मी NCB ला दिली. मग मला NCB ने च घटनास्थळी नेले. पार्टीवर रेड टाकल्यानंतर ज्या लोकांना पकडले होते त्यांच्याबाबत मला काहीच माहिती नव्हती कारण त्यांनी मास्क घातला होता''. मनिश भानुशाली यांनी त्यांच्या जिवाला धोका असून संरक्षण देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, मुंबईत एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई - गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे.
मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान मलिकांच्या आरोपानंतर भाजप आणि NCB काय स्पष्टिकरण देतं का? हे पाहावं लागेल.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.