'तो' फोटो भाजप आयटी सेलचा फर्जीवाडा- नवाब मलिक
'तो' फोटो भाजप आयटी सेलचा फर्जीवाडा- नवाब मलिक Saam TV

'तो' फोटो भाजप आयटी सेलचा फर्जीवाडा- नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात एक बैठक सुरु आहे असा, एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

वैदेही काणेकर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात एक बैठक सुरु आहे असा, एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोबद्दल आज नवाब मलिकांनी (Nawab Malik) भाष्य करत सांगितलं की, हा फोटो म्हणजे भाजप आयटी सेलचा (BJP IT Cell) फर्जीवाडा आहे.

मलिक म्हणाले, शरद पवारांचा मार्फ फोटो बीजेपी आयटी सेलने तयार करून पोस्ट केला आहे. भाजप आयटी सेलचा हा फर्जीवाडा आहे. पवार दिल्लीत होते, पवार दिल्लीत होते, एक माॅर्फ फोटो सोशल मिडीयात व्हायरल केला.

तसेच, केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी काल एक राजकीय भाकीत करून खळबळ निर्माण केली. नारायण राणे हे जयपूर मध्ये बोलत असताना म्हणाले की, मविआ सरकार येत्या मार्च महिन्यात पडेल आणि पुन्हा भाजप च सरकार सत्तेत येईल. त्यांच्या या वक्त्यव्यावर मलिक म्हणाले, हे सरकार पाच वर्ष चालेल, स्वप्नातून उठून चंद्रकांत पाटील सरकार पडले असं बोलत होते, १९९९ मध्ये राणेंच मुख्यमंत्री पद गेलं, त्यानंतर ते कांग्रेसमध्ये गेले, आत्ता भाजपमध्ये गेले.

'तो' फोटो भाजप आयटी सेलचा फर्जीवाडा- नवाब मलिक
मार्च महिन्यात मविआ सरकार कोसळणार, भाजप सत्तेत येणार : राणेंचा दावा (पहा Video)

दरम्यान, आज मलिक यांनी आरोप केला आहे की, माझी माहीती गुप्त पद्धतीने काढली जात आहे. ही हेरगिरी योग्य नाही याची तक्रार करणार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितलं आहे. तर, अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला अगदी त्याचप्रमाणे मलाही अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे असा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com