Golden Dahi Handi in Navi Mumbai: नवी मुंबईत सोन्याची दहीहंडी, काय आहे खासियत?

Golden Dahi Handi in Navi Mumbai: मुंबईजवळील सानपाडा येथे सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीची जोदार चर्चा सुरू झाली आहे.
Golden Dahi Handi in Navi Mumbai
Golden Dahi Handi in Navi MumbaiSaam tv

सिद्धेश म्हात्रे

Golden Dahi Handi in Navi Mumbai:

दहीहंडी हा सण मुंबई आणि नजीकच्या भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी गोविंदा पथक मोठ्या उत्साहाने सण साजरा करत हंडी फोडून लाखो रुपयांचं मानधनाचे मानकरी होतात. लहान मुले आणि तरुणांच्या आवडीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. मुंबईजवळील सानपाडा येथे सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीची जोदार चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

मुंबई जवळील नवी मुंबईतील सानपाडा विभागातील समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या साई भक्त सेवा मंडळाने भव्य सोन्याच्या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. नवी मुंबईतील सोन्याची साईहंडी फोडण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यातून गोविंदा पथक येतात. ही हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळते.

Golden Dahi Handi in Navi Mumbai
Maratha Reservation: 'फडणवीस यांनी राजीनामा द्यावा', ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेऊन दिलं निवेदन

नवी मुंबईतील ही सोन्याची दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदा पथकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. नवी मुंबईतील या साईहंडी आणि व्यासपीठाची विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, उद्या या सोन्याच्या साईहंडीचा थरार पाहण्यासाठी नवी मुंबईकरांना मोठी गर्दी करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी केलं आहे.

ठाण्यात दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार

दरम्यान, ठाण्यातही दहीहंडी पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील टेंभी नाक्याची दहीहंडी देखील खूप प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतो. यावर्षी देखील टेंभी नाक्यावर दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Golden Dahi Handi in Navi Mumbai
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग, मंत्रिमंडळ बैठकीत कुणबी प्रमाणपत्र रिपोर्टबाबत मोठा निर्णय

यंदाही ठाण्याच्या टेंभी नाक्यांवर गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतं. यंदाही टेंभी नाक्यावरील दहीहंडीचा उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com