

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत ५२७ रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा
पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू
तुम्ही पोलीस होण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) साठी भरतीची घोषणा केलीय आहे. जवळपास ५२७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील म्हणाले, ही भरती मोहीम नवी मुंबई पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. शहरी क्षेत्राची जलद वाढ आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे, कार्यक्षम कायद्याच्या अंमलबजावणीची गरज वाढत आहे. नवीन भरतीमुळे वाहतूक व्यवस्थापन, गस्त घालणारे युनिट्स आणि विशेष ऑपरेशन्ससाठी मनुष्यबळ वाढेल," असे ते म्हणाले.
एकूण रिक्त पदांपैकी ४४५ पदे पोलिस कॉन्स्टेबलसाठी असणार आहेत. तर ८२ पदे पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर्स) साठी असतील. जो उमेदवार नोकरीसाठी अर्ज करणार आहे, त्याच्याकडे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षा किंवा कोणत्याही सरकार-मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. NIOS वरिष्ठ माध्यमिक आणि CBSE इयत्ता 12वीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असणार आहे. तर राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयाची १८ ते ३३ वर्षे आहे. पोलीस कॉन्स्टेबल चालक पदासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची मर्यादा १९ ते २३ वर्ष असेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची मर्यादा १९ ते ३३ वर्ष असणार आहे.
निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश असेन. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ४५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये ठेवण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.