Salman Khan News : सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस; भाईजानला मारण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर

Salman Khan News update : सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचे समोर आलं आहे. या गँगने सलमान खानच्या हत्येसाठी कट रचल्याचं समोर आलं आहे. तसेच सलमानच्या मागावर काही माणसे ठेवली होती.
सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस; पाकिस्तानचे कनेक्शन आलं समोर
Salman Khan House Firing CaseSaam tv

विनोद पाटील, साम टीव्ही मुंबई

मुंबई : बिश्नोई गँग सलमान खानच्या हत्येसाठी वारंवार कट रचत असल्याचं समोर आलं आहे. तर आताही बिश्नोई गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. मात्र नवी मुंबई पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. मात्र या हत्येच्या कटामागे पाकिस्तान आणि कॅनडा कनेक्शन समोर आलं आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानच्या हत्येचा कट आखला असल्याचे समोर आलं आहे. मात्र हा कट नवी मुंबई पोलिसांनी उधळल्याचं समोर आलं आहे. महिनाभरापूर्वी सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. मात्र बिश्नोई गँग सलमानचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्यातच बिश्नोई गँगने सलमानच्या हत्येचा नवा कट रचल्याचं समोर आलं.

सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस; पाकिस्तानचे कनेक्शन आलं समोर
Ankita Lokhande Post : अंकिता लोखंडेला फिल्मइंडस्ट्रीमध्ये झाले १५ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीची भावुक पोस्ट व्हायरल

अन् सलमानच्या हत्येचा कट उघडकीस आला

सलमानला कार, घरात, फार्म हाऊसवर किंवा शुटिंग स्थळी घुसून मारण्याचा कट बिष्णोई गँगचा होता. सलमानची रेकी करण्यासाठी मुंबई, ठाण्यासह परराज्यातील 50 ते 60 जणांना कामाला लावले होते.

सलमानला मारण्यासाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर करण्यात येणार होता. सलमानला मारण्यासाठी एके ४७, एके९२ आणि एम१६ यासारखी अत्याधुनिक शस्त्रे पाकिस्तानहून मागविण्यात आले होते. कॅनडातून अर्ध पेमेंट गोल्डी बार आणि अर्ध पेमेंट शस्त्रांची डिलिव्हरी झाल्यानंतर कॅशमध्ये करण्यात येणार होतं.

सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस; पाकिस्तानचे कनेक्शन आलं समोर
Shubman Gill Wedding : शुभमन गिल १० वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार? ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्रीने केला खुलासा

पाकिस्तानमधील डोगर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात बिश्नोई गँग होती. गोळीबार झाल्यानंतर कन्याकुमारीमार्गे श्रीलंकेतून परदेशात पळून जाण्यासाठी अनमोल बिश्नोई मदत करणार होता. अजय कश्यप, गौरव भाटिया, वस्पी खान, झिशान खान या चार आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

या अटकेनंतर आरोपींनी सलमान खानच्या हत्येविषयी माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे सलमान खानच्या हत्येचा कट उधळला असला तरी या हत्येच्या कटामागे कॅनडा आणि पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे या आरोपींकडून आणखी काय माहिती समोर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com