Navi Mumbai: आई नव्हे तू वैरीण! १५ दिवसांच्या बाळाला लोकलमध्ये ठेवून फरार, घटना CCTV मध्ये कैद

Seawood Railway Station: नवी मुंबईमध्ये १५ दिवसांच्या बाळाला लोकलमध्ये सोडून आई फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेत आहेत.
Navi Mumbai: आई नव्हे तू वैरीण! १५ दिवसांच्या बाळाला लोकलमध्ये ठेवून फरार, घटना CCTV मध्ये कैद
Navi Mumbai Crime Saam Tv
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई

पनवेलमध्ये एका अज्ञात महिलेने दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला फुटपाथवर सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच सीवूडमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली. लोकलमध्ये १५ दिवसांच्या बाळाचा ठेवून आई फरार झाली. हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. ३० ते ३५ वयोगटातील एका महिलेने सीएसएमटी-पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाचा परित्याग केला आणि पळ काढला. लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून ती महिला सिवूड रेल्वे स्थानकावर न उतरता पुढे निघून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू (१९ वर्षे) आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात होत्या. सदर महिला सानपाडा रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली. सीवूड्स स्थानकावर मला उतरायचे असल्याचे सांगून या महिलेने आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती दोन तरुणींकडे केली. त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सिवूड स्थानकावर खाली उतरल्या. सीवूडला उतरताना महिलेनं तरुणींच्या हातात बाळ दिलं. या दोन्ही मुली या महिलेचे बाळ घेऊन लोकलमधून खाली उतरल्या पण महिला लोकलमधून न उतरता पसार झाली.

Navi Mumbai: आई नव्हे तू वैरीण! १५ दिवसांच्या बाळाला लोकलमध्ये ठेवून फरार, घटना CCTV मध्ये कैद
Virar Crime : सोसायटीतील सोलर पॅनल बसविण्यावरून वाद; रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज तरुणींनी लावला. बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला परत न आल्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai: आई नव्हे तू वैरीण! १५ दिवसांच्या बाळाला लोकलमध्ये ठेवून फरार, घटना CCTV मध्ये कैद
Mumbai Crime News : अल्पवयीन मित्राने मैत्रिणीला टेरेसवरुन ढकललं, भांडूपमधल्या मुलीच्या आत्महत्येत मोठा खुलासा

बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केले असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर महिला ही खानदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीमेत अडचणी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Navi Mumbai: आई नव्हे तू वैरीण! १५ दिवसांच्या बाळाला लोकलमध्ये ठेवून फरार, घटना CCTV मध्ये कैद
Nagpur Crime : दुचाकीनं चायनीजच्या टपरीवर जाताना अडवलं, जुन्या रागातून टोळक्याने संपवलं; नागपुरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com