नवी मुंबईतील तुर्भे बस डेपोला भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये तुर्भे बस डेपोला आग लागल्याचं दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही आग कशी लागली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे बस डेपोला मंगळवारी आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यात आगारात उभ्या असलेल्या काही बसेसला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)
या आगीमुळे किती नुकसान झाले आहे किंवा त्यात काही जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आगीच्या कारणाचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, पालघर मधील बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर N - 195 वर असलेल्या ऑक्टो कंपनीच्या गोडाऊनला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. वॉल पेपरच्या गोडाऊनला सर्वप्रथम आग लागल्यानंतर ऑक्टो इंटरियल ही कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी आली असून आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, या आगीचे धुराचे लोण लांबच लांबपर्यंत दिसून आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.