NMMT Buses: रेल्वेच्या मेगाब्लॉकवर NMMT नं काढला मार्ग; बेलापूर-पनवेलदरम्यान सोडणार ३२ विशेष बस

Navi Mumbai City Transport: बेलापूर आणि पनवेल रेल्वे स्टेशनदरम्यान विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही स्टेशनदरम्यान ३२ विशेष बस धावणार आहेत.
NMMT Buses
NMMT BusesSaam Tv
Published On

NMMT Special Buses :

उपनगरातील प्रवाशांना उशिरा रात्री प्रवास करण्यासाठी नवी मुंबई नगर परिवहन (NMMT)द्वारे बेलापूर आणि पनवेल रेल्वे स्टेशनदरम्यान विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही स्टेशनदरम्यान ३२ विशेष बस धावणार आहेत. पनवेल स्टेशनवर माल वाहतुकीसाठी अप आणि डाऊन मार्ग तयार करण्यात येत आहे. हा मार्ग २ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. (Latest News on Maharashtra)

मध्य रेल्वेकडून बेलापूर ते पनवेलपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेलस्टेशन यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मार्ग निर्माण करण्याचे काम चालू असणार आहे. यामुळे रात्री ३ ते ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेचा हा ब्लॉक प्रत्येक रात्री घेण्यात येणार असून तो २ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच रात्रीच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलपर्यंतच्या लोकल रेल्वेच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या आहेत.

तर सकाळी धावणाऱ्या काही लोकलदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. हे गोष्ट लक्षात घेता नवी मुंबई नगर परिवहननं रात्रीच्यावेळी काही अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई महानगरपालिका ट्रान्सपोर्टचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर योगेश कडुस्करनं सांगितलं की, मध्य रेल्वेकडून पत्र दोन्ही बाजूनं विशेष सेवा सुरू करण्याची विनंती केलीय. दरम्यान पनवेल आणि बेलापूरदरम्यान एनएमएमटीनं एकूण ३२ विशेष बस सेवा सुरू केली आहे.

उशिरा रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ८ बस पाठवण्यात येणार आहेत. या बस सायन-पनवेल या राजमार्गाचा उपयोग करेल. शेवटची बस सकाळी ७.२६ वाजता निघेल. तर पनवेलपासून निघणारी बस ही सकाळी ६.३४ वाजेपासून प्रवास सुरू करेल. दोन्ही ठिकाणांवरून निघणाऱ्या बस या मध्यरात्री प्रवास सुरुवात करतील. पनवेल स्टेशनवर दीर्घकाळापर्यंत रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पनवेल शहर आणि आसपासच्या प्रवाशांना प्रवास करता येत नाही.

प्रवाशांची ही समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेनं विशेष ३२ बस सेवा देण्याचं ठरवलं आहे. दीर्घकालीन ब्लॉकमुळे लोकल रेल्वेच्या फेऱ्यांच्या वेळेवरही परिणाम झालाय. यामुळे सीएसएमटी ते पनवेल दरम्यान धावणारी शेवटची लोकल रेल्वे रात्री १०. ५८ वाजता प्रवास सुरू करत असते. तर पनवेलकडून सीएसएमटीकडे निघणारी पहिली लोकल सकाळी ५.४० वाजेपासून प्रवास सुरू करते.

NMMT Buses
Mumbai Pune Expressway: दोन तासांचा ब्लॉक ४० मिनिटातच आटोपला; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com