१०० टक्के कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेने नोटीस बजावली; राणेंचा आरोप

महापालिका त्यांच्याकडे आहे. हा दुष्टपणा मा. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र आता शिवसेनेचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत.
नारायण राणे
नारायण राणेSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई - भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या बंगल्याबाबत आलेल्या नोटीशीचा(Notice) खुलासा केला. ते म्हणाले, अनेकांचे फोन आले की तुमच्या घरावर नोटीस बजावली आहे. त्यामुळे वास्तववादी चित्र मांडण्यासाठी आलो आहे. या घरात मी 17 सप्टेंबर 2009 साली आलो. आज जवळपास 13 ते 14 वर्षे झाली. या इमारतीचे आर्टिटेक तलाठी आहेत. देशात त्यांचे नाव आहे. त्यांनी इमारत बांधली. डिसी नियमानुसार ही इमारत बांधली गेली.

हे देखील पहा -

संपूर्ण कायदेशीर काम केले आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलेले नाही. या घरात आम्ही फक्त आठ जण राहतो. तिथे अन्य कुठलाही व्यवसाय चालत नाही. हे कुणालाही विचारा. १०० टक्के कायदेशीर इमारत असतानाही शिवसेनेकडून नोटीस बजावली गेली. महापालिका त्यांच्याकडे आहे. हा दुष्टपणा मा. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र आता शिवसेनेचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत.

नारायण राणे
Nagpur: सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

पुढे नारायण राणे म्हणाले कीते म्हणाले, मातोश्री 2 आणि 1 दोन्हीचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर येत नाही. सूडबुद्धी असलेले लोक सत्तेवर आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जुहूमधील बंगल्याची तक्रार करणारा मुंबईतला नव्हे तर सिंधुदुर्गातला कोकणी माणूस आहे. मी साहेबांना सांगितले घर बांधतो तेव्हा साहेबांनी माझे अभिनंदन केले. आज बाळासाहेब असते तर माझ्या बंगल्याच्या भूमीपुजनाला नक्की आले असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com