सुशांत सावंत
मुंबई: केंद्रीय मंत्रीं नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवातीला संजय राऊतांना टार्गेट केले. 15 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेला उपस्थित होता. त्यामुळे त्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणा किंवा संजय राऊत यांची जी केविलवाणी परिस्थिती झाली आणि घाम कशामुळे फुटला, की चुकीच्या कामामुळे घाम फुटला हे सांगण्यासाठी ही पत्रकार घेत आहे असं नारायण राणे म्हणाले. संजय राऊत नेहमी म्हणत असतात मी मर्द माणूस आहे.
मर्द माणसाला मर्द आहे सांगायची आवश्यकता नाही. संजय राऊत अनेकदा मी कोणाला घाबरत नाही. पण तुला विचारतो कोण? जाहिरात काय केली राज्य भरातील शिवसैनिक, मंत्री येणार म्हणाले, पण साधा विभाग प्रमुख देखील नव्हता अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. (Narayan Rane On Sanjay Raut)
राऊत इडीकडे जाऊ नका बिडी प्यायला लावतील
संजय राऊत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणले होते मी माझ्याकडे असलेले सर्व पुरावे इडीला देणार आहे. आणि चौकशीची मागणी करणार आहे. त्यावर आज नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. 'ईडीशी बोलू नका बिडी प्यायला लावतील' शिवसेना भवन बांधताना तुम्ही कुठे होता? तुम्ही सेना भवनासाठी पाच पैसे देखील दिले का? काल मफलर इकडून तिकडे करत होते आणि त्याच मफलरने घाम पुसत होते अशी खोचक टीका राणेंनी राऊतांवर केली आहे. काल त्यांनी आरोप केला पण पुरावे दिले नाही. जर आमच्या जास्त मागे लागलात तर आम्ही सर्व पुरावे देऊ मग पळता भुई थोडी होईल असेही राणे म्हणाले.
संजय राऊत हे पगारी नेते
संजय राऊत तुमची काय लायकी आहे? पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा ते म्हणाले होते मला पद मिळाले नाही तर मी बाळासाहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे कपडे उतरवीन. साहेबांबद्दल बोललेलं मी आयुष्यात कधी ऐकून घेतले नसते हे एवढ्या घाणेरड्या पातळीवर बोलले असे नारायण राणे म्हणले. प्रवीण राऊतांच्या चौकशी नंतर आपल्याला आणि अनिल परब यांना अटक होणार म्हणून हे चिडचिड करत आहेत. संजय राऊत हे पगारी नेते आहेत. ते सामानाचे संपादक आहेत. एका बाजूला म्हणायचे मी संपादक आहे आणि दुसऱ्या बाजूला छापखाना अशीही टीका नारायण राणेंनी केली आहे.
'जसे काय शिवसेना प्रमुख राऊतचं...'
पुढे राणे म्हणले एवढे दिवस सेना भवन आठवले नाही. काय भगवी शाल घालून आले, जसे काय शिवसेना प्रमुख हेच आहेत. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांचा पक्षातील इतिहास सांगितले. 10 मे 1092 ला संजय राऊत सामनात संपादक म्हणून आले. लोकप्रभात असताना त्यांनी पराक्रम केले. त्यांनी त्यावेळी बाळासाहेब यांच्या विरोधात अनेक मूलाखती लिहिल्या. माझ्याकडे लोकप्रभाचे सर्व अंक आहेत. साहेबांनी हा पत्रकार कसा आहे हे सांगितले मी आज इथे बोलू शकत नाही. हा पत्रकार कशी अंतर्गत आग लावता येईल असे साहेबांनी राऊतांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले असल्याचे नारायण राणे म्हणाले. संजय राऊतांना बाळासाहेब लाचार पत्रकार म्हणाले होते असे नारायण राणे म्हणले.
राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर...
लोकप्रभात असताना उद्धव आणि साहेब या दोघांवरही टीका करायची सोडली नव्हती. राऊत हे पत्रकार नाहीच, संपादक नाही तुमची भाषा त्या गुणवत्तेची नाही. हे काल का असा अस्वस्थ झाले होते? घामाघूम झाले होते. प्रवीण राऊत यांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय राऊतांचा थयथयाट झाला अशी जहरी टीका नारायण राणेंनी राऊतांवर केली आहे. अलिबागच्या जमीनीवर तिथे रस्ताही खासदार फंडातून केला. सुजित पाटकर कोण? तुमच्या मुली कशा काय पार्टनर? हे शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीकडे आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अर्धा नाही तर पूर्ण आहेत अशी टीकाही नारायण राणेंनी केली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.