Nana Patole News: हे पंतप्रधान मोदी विसरले का? 'त्या' टीकेचा नाना पटोलेंकडून समाचार

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.
Nana Patole vs Narendra Modi
Nana Patole vs Narendra ModiSaam TV

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे सरकार मुंबईचा विकास होऊ देत नव्हते, भ्रष्टाचार होत होता असा आरोप मोदींनी केला. परंतु मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.  (Latest Marathi News)

Nana Patole vs Narendra Modi
PM Narendra Modi ...तर मुंबईचा विकास जलदगतीने होईल; मोदींनी सांगितला शहराच्या विकासाचा मंत्र

इतकंच नाही तर, शिवसेनेने विकास केला नाही किंवा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्याबरोबर २५ वर्षे सत्तेत असलेला भाजपा कसा काय नामानिराळा राहू शकतो ? असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील बीकेसी येथील सभेत टीका करताना, गेली २५ वर्षापासून मुंबईचा विकास रडखडला असल्याचं म्हटलं. मोदींच्या या टीकेचाही पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. (Maharashtra Political News)

'मुंबई व महाराष्ट्राचा विकास झाला नाही पण मागील सहा महिन्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळेच विकासाची गती वाढली असा दावा करताना मुंबई महानगर पालिकेच्या कारभावरही त्यांनी टीका केली. भारतीय जनता पक्ष व शिवसेना मागील २५ वर्षे युतीची सत्ता महानगरपालिकेत होती. उपमहापौरपदासह विविध पदे भाजपाकडेही होती मग भ्रष्टाचारचा वा विकास झाला नसल्याचे खापर एकट्या शिवसेनेवर कसे फोडता येईल. जे काही झाले असेल त्यात भाजपाचाही तितकाच वाटा आहे हे पंतप्रधान मोदी विसरले का?, असा टोला नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला.

Nana Patole vs Narendra Modi
Narendra Modi : पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल; शिंदे-फडणवीसांनी केलं जंगी स्वागत, महाराष्ट्राकडून दिली अनोखी भेट

मुंबईत आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रकल्पाची सुरुवात महाविकास आघाडी सरकार असतानाच झाली होती, ती काही मागील सहा महिन्यात झालेली नाहीत परंतु ते सर्व आपणच केले आहे अशा अविर्भावात त्याचे श्रेय मात्र घेतले. भाजपाने पंतप्रधानांच्या हस्ते गटारींचेही उद्घाटन करून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपाने मविआ सरकारच्या कामांचे श्रेय लाटले. आजच्या भाषणात पंतप्रधांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा दोन तीनदा उल्लेख केला पण शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व राज्यपाल कोश्यारी यांना चार खडे बोल सुनावले असते तर बरे झाले असते पण मोंदींनी ते केले नाही. असंही पटोले म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com