सुशांत सावंत -
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया, राज्यातील लोडशेडिंग, तसेच भाजपला कसे उत्तर देता येईल याविषयी चर्चा झाल्याची माहितीये. नाना पटोले यांनी या भेटीनंतर ही माहिती दिली (Nana Patole and Sharad Pawar meeting about power cut in state).
लोडशेडिंगचा प्रश्न सोडवण्याविषयी चर्चा - नाना पटोले
राज्यामध्ये सध्या लोडशेडिंगचे (load shedding) प्रमाण वाढले आहे. केंद्राने (Central Govt) कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद पडले आहेत. हा प्रश्न तातडीने कसा निकाली काढता येईल याचसोबत केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigating Agency) याबाबत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. तसेच, भाजपला कसे उत्तर द्यायचे याबाबत येत्या एक दोन दिवसात चर्चा करु, असंही ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार हा विषय आमच्या पातळीवरचा नाही. हायकमांड यावर निर्णय घेईल. महामंडळ वाटप यावर देखील या बैठकीत चर्चा झाली. दोन ते तीन दिवसात आम्ही एकत्र येऊ आणि मग चर्चा करू. मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करg, अशीही माहिती पटोलेंनी दिली.
तसेच, पटोलेंनी आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणावरुनही भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांत जहाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जी वर्गणी गोळा केली होती त्याचा हा प्रश्न आहे. विषयाला वेगळे वळण देण्याची प्रक्रिया आहे. पैशांचा प्रश्न आहे, याचे उत्तर का भाजप देत नाहीये, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.