Mumbai University: मुंबई विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत, मराठीचं महत्व वाढविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापरीठाने परिपत्रक काढत या निर्णयाची घोषणा केलीये.
Mumbai University
Mumbai UniversitySaam Tv
Published On

सुमित सावंत -

मुंबई: मराठीचं महत्व वाढविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत असणार आहे. महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापरीठाने परिपत्रक काढत या निर्णयाची घोषणा केलीये (Nameplates of all colleges under Mumbai University are in Marathi Language).

Mumbai University
Mumbai University: मुंबई विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलकं मराठीत करा, युवासेनेची मागणी

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालयातील नामफलकं तसेच, इतर सूचनाफलकं हे दुकानांच्या पाट्यांप्रमाणे मराठीत असावे, अशी मागणी युवा सेनेकडून (Yuva Sena) करण्यात आली होती.

परिपत्रकातील आदेश

1. सहज दृष्टोत्यतीस येईल अशा पध्दतीने महाविद्यालयाचे नाव दर्शनी भागात मराठीत (Marathi) असावेत.

2. महाविद्यालयाचे माहितीपुस्तक व प्रवेश अर्ज मराठी मध्ये सुध्दा उपलब्ध करून देण्यात यावेत.

3. महाविद्यालयांच्या पत्रव्यवहारात प्राधान्याने मराठीचा वापर करण्यात यावा.

4. महाविद्यालयांच्या सूचना मराठीतून लिहिण्यास प्राधान्य देण्यात यावे.

5. कार्यशाळांमध्ये प्राधान्यवे मराठीचा वापर करण्यात यावा.

6. मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात यावा. विविध चर्चा सत्रे, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात यावे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com