Nagar Breaking News: श्रीपाद छिंदमसह 11 जण नगर जिल्ह्यातून हद्दपार

या दोघांना एक वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
shripad chindam
shripad chindamsaam tv
Published On

नगर : नगर (nagar) जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (manoj patil) यांनी शिवद्रोही श्रीपाद छिंदम (shripad chindam) व त्याचा बंधू श्रीकांत छिंदम (shrikant chindam) याच्यासह अकरा जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. (shrikant chindam latest marathi news)

एककाळ अहमदनगर महापालिकेत उपमहापौर राहिलेल्या श्रीपाद छिंदमने (shripad chhindam) महापालिकेच्या एका कर्मचाऱ्या बरोबर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे तो राज्यभर टीकेचा विषय ठरला होता. श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांच्यावर यापूर्वीच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

shripad chindam
Norway Chess 2022 : विश्वनाथन आनंदची जगजेत्या मॅग्नस कार्लसनवर मात

छिंदम बंधूंच्या विरोधात अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात सात गुन्ह्यांची नोंद आहे. यात मारहाण करून गंभीर दुखापत करणे, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, मालमत्तांचे नुकसान करणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. या दोघांना एक वर्षांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

shripad chindam
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? मग कशासाठी 'हा' आटापिटा : सदाभाऊ खाेत
shripad chindam
Raju Shetti News : देशात झुंडशाही, गलिच्छ राजकारण सुरु आहे : राजू शेट्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com