Mumbai: पालिका बेस्टला देणार ६ हजार ६५० कोटींच अनुदान; प्रस्ताव महासभेत मंजूर

यानुसार आगामी स्थायी समितीपुढे निधी हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.
BMC
BMC Saam Tv

मुंबई - आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला (Best Bus) पालिकेकडून वेळोवेळी अर्थसहाय्य केलं जातं. आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य पालिकेने (Municipal Corporation) बेस्टला केलं आहे आणि आता पुन्हा एकदा ६ हजार ६५० कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. (Mumbai Latest News)

यानुसार आगामी स्थायी समितीपुढे निधी हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. यामध्ये ६ हजार ६५० कोटी ३१ लाख रुपये पालिका अर्थसंकल्प 'अ' मधून वर्ग 'क' मध्ये हस्तांतरण केले जातील .

हे देखील पहा -

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पालिकेने अनुदान देण्यासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली होती. तर दोन वर्षांपूर्वी बेस्टच्या १ हजार ८८७ कोटी ८३ लाख रुपयांचे पालिकेने बेस्टला अनुदान देऊन मदत केली आहे.

BMC
राज्यात नगरपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 81 टक्के मतदान!

आतापर्यंत पालिकेने बेस्टला केलेलं अर्थसहाय्य

२०१५-१६ : २५ कोटी १० लाख

२०१६-१७ : १०० कोटी

२०१७-१८ : १३ कोटी ६९ लाख

२०१८-१९ : १२ कोटी ५६ लाख

२०१९-२० : २१५० कोटी ३ लाख

२०२०-२१ : १४०० कोटी

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com