Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील ३ दिवस 'या' भागात राहणार पाणी बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai Water Supply Cut : बीएमसीकडून १२ ते १४ डिसेंबरदरम्यान पाईपलाईन जोडणीच्या कामासाठी मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. के/पूर्व, एच/ईस्ट आणि जी/उत्तर वॉर्डमधील नागरिकांना कमी दाबाचा किंवा पूर्ण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील ३ दिवस 'या' भागात राहणार पाणी बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Mumbai Water Shortage NewsSaam Tv
Published On
Summary
  • बीएमसीने १२ ते १४ डिसेंबरदरम्यान मोठ्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम

  • त्यामुळे मुंबईतील के/पूर्व, एच/ईस्ट आणि जी/उत्तर वॉर्डमध्ये पाणीपुरवठा पूर्ण किंवा अंशतः ठप्प राहणार

  • दुरुस्तीमुळे पाणी दाब कमी होण्याची शक्यता असून नागरिकांना आगाऊ साठा करण्याचे आवाहन

  • दीर्घकालीन आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे काम केल्याचे बीएमसीचे म्हणणे

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील ३ दिवस मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मोठ्या प्रमाणात पाईपलाईन जोडणीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे, १२ आणि १३ डिसेंबर रोजी शहरातील अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

मुंबईतील काही भागात १२, १३ आणि १४ डिसेंबर रोजी २४ तास पाणी बंद राहणार आहे. बीएमसीने सांगितल्याप्रमाणे या काळात मोठ्या प्रमाणात पाईपलाईन जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा बंद शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि शनिवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहील. याचा परिणाम के-पूर्व, एच-पूर्व आणि जी-उत्तर वॉर्डमधील अनेक भागांवर होईल.

Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील ३ दिवस 'या' भागात राहणार पाणी बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Maval : कोट्यवधींचे तलाठी कार्यालय धुळ खातंय! खासगी ठिकाणीच महसूल कामकाज सुरू असल्याचा आरोप

बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पुढील काही दिवस पाणी बंद ठेवणे आवश्यक आहे, कारण दीर्घकालीन पुरवठा आणि सिस्टमची विश्वासार्हता सुधारण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा लाइन जोडेल. काही भागात, विशेषतः के-पूर्व वॉर्डमध्ये या काळात कमी दाबाचा पाणीपुरवठा होऊ शकतो. या कामात अनेक मुख्य पाईपलाईन जोडल्या जातील. यामध्ये १८०० मिमी तानसा पश्चिम जलवाहिनी, १२०० मिमी जलवाहिनी, २४०० मिमी वैतरणा जलवाहिनी आणि जी/उत्तर वॉर्डमधील १५०० मिमी जलवाहिनीचा समावेश आहे. असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील ३ दिवस 'या' भागात राहणार पाणी बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Pune : गुंड नीलेश घायवळचा पाय आणखी खोलात! शस्त्र पुरवठा करणाऱ्या एजंटचा मोठा कारनामा उघडं

'या' भागातील पाणी पुरवठा १२ ते १४ डिसेंबर दरम्यान बंद राहणार

जी/उत्तर वॉर्ड

  • १२ डिसेंबर: धारावी लूप रोड, एकेजी नगर, धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, दिलीप कदम रोड, जास्मिन मिल रोड, माहीम फाटक

  • १३ डिसेंबर: जास्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास रोड, ६० फूट रोड, ९० फूट रोड, संत कक्किया रोड, एमपी नगर, महात्मा गांधी रोड

के/पूर्व प्रभाग

  • 12 डिसेंबर: मरोळ, मिलिटरी रोड, वसंत ओएसिस, गावदेवी, गुंदवली, चकाला, बामनवाडा, माहेश्वरी नगर, भवानी नगर, कोंडीविटा, विमानतळ रोड परिसर, जेबी नगर, बगरका रोड आणि जवळपासचा भाग

एच/ईस्ट वॉर्ड

  • 12 डिसेंबर: संपूर्ण वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), मोतीलाल नगर

  • 13 डिसेंबर: प्रभात कॉलनी, सीएसटी रोड (दक्षिण), यशवंत नगर, सुंदर नगर, गव्हर्नमेंट कोलबारा, कोळंबी रोड, बीकेसी, बीकेसी. (पूर्व)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com