रुपाली बडवे..
Mumbai News: मुंबईकरांसाठी (Mumbai) एक चिंता वाढवणारी बातमी सध्या समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईमध्ये पाणी कपातीची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारण म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये फक्त ३७% पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या (BMC) वतीने करण्यात आले आहे. (Mumbai Water Cut)
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सातही धरणांचा एकूण पाणीसाठा क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर त्यापैकी सद्यस्थितीत ५ लाख ४५ हजार १९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा या सातही तलावांमध्ये आहे.
सध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणीपुरवठयाचे नियोजन ठरणार आहे. सद्यस्थितीत 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणी पुरेल तशा प्रकारचे नियोजन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलं आहे
मागील वर्षी मुंबईत पाऊस चांगला झाला व मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र अद्याप एप्रिल महिना सुरूही झालेला नसताना धरणांतील पाणीसाठा ३७ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच महिन्यामध्ये साती धरणातील पाणीसाठा जवळपास ४०% पर्यंत होता.
त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने आणि त्यानंतर पुढील जून जुलै असे दोन महिने असे एकूण चार महिने या धरणातील पाणीसाठ्यावर मुंबईकरांना काढावे लागणार आहेत. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो.
दर दिवशी 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात या सातही तलावातून केला जातो. यावर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये किती पाऊस पडतो, त्यावर मुंबईच्या पाणी कपाती संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.