Mumbai Water Crisis : मुंबईचं 'पाणी' पेटलं; ठाकरे गटाचं आदोलन, शिंदे गट म्हणाला, नौटंकी!

Politics On Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीप्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, त्यावरून शिंदे गटानं टीका केली आहे. शिवसेनेचे आंदोलन हे नौटंकी असल्याचं शिंदे गटानं म्हटलं आहे.
मुंबईत पाणीप्रश्न पेटला, शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, शिंदे गटाची टीका
Mumbai Water Issue Thackeray Group protestsaam tv
Published On

मुंबईत अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयांवर आंदोलन केलं. पण आता हाच पाणीप्रश्न पेटला आहे. यावरून राजकीय ठिणग्या उडू लागल्या आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक भडका उडाला आहे.

पाणीप्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेच्या विविध कार्यालयांवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. पालिकेच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर धडक देत, अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. तेथील अधिकाऱ्यांना या प्रश्नासंदर्भात निवेदने देण्यात आली. पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. दुसरीकडे, आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती.

शिवसैनिकांकडून इशारा

पाणीप्रश्नावरून शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिला होता. आम्ही या प्रश्नावर निवेदन दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी ज्या सूचना केल्या होत्या, त्या संबंधित निवेदन दिले आहे. पाणी उच्चदाबाने येईल, आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन संबंधितांकडून मिळाले आहे. आम्ही पुन्हा आठवडाभराने निवेदन देण्यास येणार आहोत. आता शांतपणे येतोय, अन्यथा शिवसेनेचा दणका तुम्हाला दाखवून देऊ, असा इशाराही सावंत यांनी दिलाय.

शिंदे गटाची ठाकरे गटाच्या आंदोलनावर टीका

शिवसेना (शिंदे गट) आमदार मुरजी पटेल यांनी ठाकरे गटाने पाणी प्रश्नावरून केलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. २५ वर्षांत एकहाती सत्ता असताना शिवसेनेने भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही. मुंबईत आता मेट्रो, मोनो, कोस्टल रोड झाला. लोकसंख्या वाढली आहे, पण पाण्याचे नियोजन जसं आधी होतं, तसेच आजही आहे, असे पटेल म्हणाले.

मुंबईत पाणीप्रश्न पेटला, शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, शिंदे गटाची टीका
Mumbai News: मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद शिगेला; संदीप देशपांडे यांचा थेट इशारा – 'कानाखाली... VIDEO

ठाकरे गटाचा आजही हंडा मोर्चा

मुंबईतील पाणीप्रश्नावर ठाकरे गट आणखी आक्रमक झालाय. पालिकेच्या मुंबईतील विविध विभाग कार्यालयांवर आजही आंदोलन करण्यात आलं. महापालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयावर आज, गुरुवारी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले. अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अंधेरीतील रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

मुंबईत पाणीप्रश्न पेटला, शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, शिंदे गटाची टीका
Mumbai : मुंबई मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा, 7 A वर टनेलद्वारे बोगद्याचे काम, मुख्यंत्र्यांकडून अचानक पाहणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com