Jain Temple Demolition : मुंबईतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश, अधिकाऱ्याची हकालपट्टी; नेमकं प्रकरण काय?

Vileparle Jain Temple Demolition : मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेनं तोडक कारवाई केली. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला.
Mumbai Vile Parle Jain Temple demolition action
Mumbai Vile Parle Jain Temple demolition actionSaam Tv News
Published On

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला.

वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती. याच मंदिर तोडक कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केली.

Mumbai Vile Parle Jain Temple demolition action
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची ५ महत्वाची कारणं, पडद्यामागचं राजकारण काय?

मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेनं तोडक कारवाई केली. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून अंधेरी के/पूर्व विभागात नवनाथ घाडगे यांची १० दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विले पार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई दरम्यान जैन धर्मियांचे धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्तावर फेकल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू बाहेर काढल्यानंतर कारवाई करावी, अशी विनंती केल्याचा दावा काही जैन समाजातील लोकांनी केला. जैन धर्मियांच्या विनंतीला मान न देता पालिकेनं जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी जैन मंदिर होते, त्याठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.

Mumbai Vile Parle Jain Temple demolition action
Supriya Sule : पांडुरंगाची इच्छा! ठाकरेंनंतर पवार एकत्र येणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com