Mumbai University : अखेर कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार दाखल

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका १० ते १२ हजारांत घरी बसून मिळेल, अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आली होती. पुणे येथील एका व्यक्तीने ती जाहिरात पाहून काही रक्कम दिल्यानंतर त्याच्या व्हॉट्‌सॲपवर एक कथित बनावट गुणपत्रिका मिळाली होती.
Mumbai University
Mumbai University Saam Digital
Published On

मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका १० ते १२ हजारांत घरी बसून मिळेल, अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आली होती. पुणे येथील एका व्यक्तीने ती जाहिरात पाहून काही रक्कम दिल्यानंतर त्याच्या व्हॉट्‌सॲपवर एक कथित बनावट गुणपत्रिका मिळाली होती. याबाबत माहिती मिळताच विद्यापीठाने त्याची गंभीर दखल घेऊन आज बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुणे येथील एका व्यक्तीने जाहिरातीबाबत फोनवरून एका व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने दोन हजार रुपये आगाऊ मागितले. पैसे भरल्यानंतर त्याच्या व्हॉट्सॲपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका आली होती, अशी माहिती मुंबई विद्यापीठास मिळाली. याबाबत विद्यापीठाने लेखी पोलिस तक्रार केली असून ही बाब समाजाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणारी आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे त्यात म्हटले आहे.

Mumbai University
Mumbai News: गुन्हा दाखल न करण्यासाठी १० लाखांची मागणी, लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

फसव्‍या जाहिरातींना बळी पडू नये!

कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. ही गुणपत्रिका बनावट आहे. फोटोशॉप किंवा इतर साधनांचा वापर करून बनावट गुणपत्रिका बनवली आहे. एप्रिल २०२३ ची बीएससी सत्र ६ ची ही कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका आणि पदवी देणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.

Mumbai University
Pune News: धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com