Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभ

mumbai university degree distribution News: मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभ पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलातील फिरोशहा मेहता भवनात हा समारंभ गुरुवारी दुपारी पार पडला.
Mumbai University Latest News
Mumbai University Latest News Saam tv

Mumbai University Degree Distribution :

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभ पार पडला. मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलातील फिरोशहा मेहता भवनात हा समारंभ गुरुवारी दुपारी पार पडला. संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. यावेळी २०२० ते २०२३ या शैक्षणिक वर्षातील विभागातील विद्यार्थ्यांना पदवीदान संपन्न झाले. (Latest Marathi News)

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा दीक्षांत समारंभाला चित्रपट आणि मालिका निर्माते नितीन वैद्य, पत्रकार प्रसाद काथे, पत्रकार अल्का धुपकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट पदवी देण्यात आल्या.

तसेच विद्यापीठातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रातील रोजगारांच्या संधीविषयी माहिती दिली. तसेच उपस्थित तज्ज्ञ मंडळींकडून देशातील सध्यस्थितीवरही भाष्य करण्यात आलं.

Mumbai University Latest News
Raj Thackeray Speech Points: राज ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे; मनसैनिकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

नितीन वैद्य काय म्हणाले?

माध्यमांशी संवाद साधताना नितीन वैद्य म्हणाले, 'समजातील अखेरच्या माणसाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. या वर्गासाठी झगडलं पाहिजे. सामान्य वर्गाच्या उत्कर्षासाठी झटलं पाहिजे. सामान्य लोकांची बाजू योग्यपणे मांडली पाहिजे'.

Mumbai University Latest News
Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे तब्बल ९०० एकरमध्ये जंगी सभा घेणार; कोट्यवधी मराठे पुन्हा एकवटणार!

संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप काय म्हणाले?

डॉ. सुंदर राजदीप म्हणाले, 'आमच्या विभागातील ज्या विद्यार्थ्यांनी जे ज्ञानार्जन केलं आहं. त्यांनी त्या अभ्यासाचा सकारात्मकरित्या उपयोग केला पाहिजे. आमच्या मनोकामना या विद्यार्थ्यांसोबत आहेत. विभागात घेतलेल्या शिक्षणाचा संपूर्ण देशाला आणि भारतीय समाजाला उपयोग होईल, देशातील सर्व समाजाच्या समस्या सुधारल्या जातील, असं कार्य विद्यार्थ्यांनी करावं, अशी आमची धारणा आहे, असं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com