मुंबई: गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये (ShivajiNagar, Govandi) चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. ताह आझम खान असे मृत मुलाचे नाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, लहान ताहला एका नर्सिंग होममधील 17 वर्षांच्या क्लिनरने इंजेक्शन दिले आहे.
पोलिसांनी (Police) डॉक्टर आणि नर्सिंग होमच्या मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोवंडीच्या बैंगनवाडी भागातील ताह खान याला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या पालकांनी 12 जानेवारी रोजी नूर रुग्णालयात त्याला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती सुधारली खरी, पण याच रुग्णालयात एका 16 वर्षीय रुग्णाला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र लिहून त्याला औषध आणि इंजेक्शन कुठे द्यायचे? अशी विचारणा केली. (Mumbai Crime News)
अधिकाऱ्याने नर्सला इंजेक्शन देण्यास सांगितले होते. मात्र, इंजेक्शनवरून (Injection) दोन परिचारिकांमध्ये वाद झाला होता. यावेळी एका नर्सने एका मुलीला साफसफाई (Cleaning) करण्यास सांगितले. या गोंधळात 16 वर्षीय रुग्णाला इंजेक्शन देण्याऐवजी कर्मचाऱ्याने ते इंजेक्शन दोन वर्षांच्या चिमुरड्याला देऊन टाकले. यामुळे थोड्याच वेळात ताह मरण पावला आहे.
हे देखील पहा-
त्याच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी कुटुंबीयांना सर्व सांगून तक्रार दाखल केली. गुरुवारी, या मुलाचा इंजेक्शनचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर अहवाल आला. या सर्व प्रकारामुळे शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे मालक, संचालक, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि सफाई कामगारांवर गुन्हा (Case) दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.