Mumbai : मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावरून सेनेचे दोन्ही गट आमने-सामने; ठाकरे गटाच्या नगरसेवकांना वेगळीच भीती

मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक वेगळीच भीती सतावत आहे.
Maharashtra Political news
Maharashtra Political news Saam Tv
Published On

निवृत्ती बाबर

Thackeray Group News : शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात एकच राडा पाहायला मिळाला. शिवसेनेच्या दोन्ही गटाने शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक वेगळीच भीती सतावत आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Political news
Big Breaking | शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा; पाहा सविस्तर बातमी

शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे गटाचे राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के आदी नेते पाहायला मिळाले. या घटनेची कुणकुण ठाकरे गटाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना लागताच कार्यालयात हजर झाले. त्यावेळी दोन्ही गटात एकच राडा झाला, तर धक्काबुक्की देखील पाहायला मिळाली.

मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची सावध भूमिका घेतली आहे. उद्या, गुरुवारी ठाकरे गटाचे नगरसेवक पालिकेच्या मुख्यालयात जमणार आहेत. या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा होईल.

आज,बुधवारी झालेल्या प्रकाराबद्दल ठाकरे गटाच्या नगरसेवकांना पोलीसांकडून पोलीस स्थानकात चौकशीसाठी येण्यासाठी फोन येत आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून माहिती समोर आली आहे. यानंतर दोन्ही गटातील उपस्थितांची चौकशी करावी अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. तर दुसरीकडे पोलीस स्थानकात बोलावून खोट्या गुन्हात अडकवलं जाईल, अशी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भीती आहे.

Maharashtra Political news
Shinde Group vs Thackeray Group | मुंबईत पालिकेत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

पक्ष कार्यालयात नेमकं काय घडलं ?

आज, राहुल शेवाळे , शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर त्यांनी दावा केला. शिंदे गटाने पक्ष कार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला.

शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर ठाकरे गट आमने सामने आले आहेत. त्यानंतर पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. शिंदे गटाने पालिकेच्या पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची सुरू होती. यानंतर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षक यांनी दोन्ही गटांना बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com