
राज्यात जीबीएस फोफावत असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. त्यानुसार आतापर्यंत जीबीएसने ८ जणांचा जीव घेतलाय. राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या दोनशे पार झालीय. तर आत्तापर्यंत १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यातून ५४ रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत तर २० जण व्हेंटिलेटवर आहेत.
GBS च्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या २०३ पर्यंत वाढलीय. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, २०३ पैकी १७६ प्रकरणांवर जीबीएससाठी उपचार केले जात आहेत. त्यापैकी ५२ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. महाराष्ट्रात गुइलेन-बेरी सिंड्रोम (जीबीएस) च्या संशयित रुग्णांची संख्या दोनशे पार गेली आहे. तर मुंबईत या आजारामुळे पहिला मृत्यू झालाय. तर राज्यात महिनाभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या सर्वाधिक असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिलीय. त्यापैकी ५२ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ४१ रुग्णांव्यतिरिक्त ग्रामीण भागातील ९४ रुग्ण, जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील २९ रुग्ण आणि पुणे ग्रामीण भागातील ३१ रुग्ण, इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये जीबीएसवर उपचार घेत आहेत.
जीबीएस हा दुर्मिळ आणि न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखी आहेत. यात सर्दी, खोकला आणि कावीळ यांचा समावेश होतो. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि शरीराचे अवयव सुन्न होतात. जीबीएसची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २७ जानेवारी रोजी सात सदस्यीय पथक पुण्याला पाठवले होते. दरम्यान, जीबीएसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला रुग्णांच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यास सांगितले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.