मुंबई: मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पाणी शिरले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेस्थानकात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत, पण पावसाचा जोर कायम आहे.(Mumbai Latest Marathi News)
संध्याकाळी सर्व ऑफीस सुटलेले असतात त्यामुळे रेल्वेस्थानकात गर्दी असते. त्यामुळे काल या रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होती. दोन दिवसापूर्वी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागात मुसळधार पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. (Mumbai Rain Latest News )
मुंबईत काल (सोमवार) पासून पावसाची संततधार सुरू होती. आज मुंबईसह नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल (Local) सेवेला बसला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटं विलंबाने धावल्या. त्यामुळे लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात सोमवारी सकाळपासून पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे या जोरदार पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. काल सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्टेशन दरम्यान मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे या स्टेशनदरम्यान काही ठिकाणी रुळावर पाणी साचले. त्यामुळे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या काही ट्रेन या १०-१५ मिनिटं विलंबाने धावत आहे. तर हार्बर मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटे विलंबाने धावल्या. मात्र, ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत. तसेच ट्रेन्स हार्बर व नेरूळ/ बेलापूर खारकोपर मार्गावर ट्रेन्स सुरळीत सुरू होत्या.
मुंबई हवामान खात्याने मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तास मुंबईपरिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Mumbai Rain Uptate )
दोन दिवसांपूर्वी मुंबईत पावसाने दडी मारली होती. मात्र, त्यानंतर कालपासून मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेला मुंबईकर सुखावला आहे. त्यात मुंबईत हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांनंतर नवी मुंबईत चांगलाच धोर धरला आहे. नवी मुंबईत गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने देखील सांगितले. नवी मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.