Mumbai News: मुंबईत नाल्यात वाहून गेलं फ्रीज, कपाट आणि पलंग; अंधेरीत नुकतीच बांधलेली भिंत कोसळली

मुंबईत नाल्यात वाहून गेलं फ्रीज, कपाट आणि पलंग; अंधेरीत नुकतीच बांधलेली भिंत कोसळली
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv
Published On

Mumbai Latest News: मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील मोगरा नाल्याच्या किनाऱ्यावर बांधलेली संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळली आहे. यामुळे या भिंतीवर पालिकेने केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून कंत्राटदाराने बांधलेल्या या भिंतीच्या कामाच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अंधेरी के पश्चिम प्रभात कार्यालयातील एसडब्लूडी विभागाने अंधेरी पश्चिमेकडे असलेल्या दाऊद बाग म्युनिसिपल शाळेमागील क्रिस्टल हार्मनी इमारतीजवळ नुकतीच वीट सिमेंटने नऊ इंच रुंदीची संरक्षक भिंत नुकतीच बांधली.

Mumbai News
Aditya Thackeray on Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा अपेक्षित नाही, शिंदेच्या त्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे संतापले

यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्च देखील मात्र पहिल्याच पावसात अंधेरीतील अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे मोगरा नाल्याचा वेगवान प्रवाह पुढे ही भिंत टिकाव धरू शकली नाही. वास्तविक या ठिकाणी काँक्रीटचे संरक्षक भिंत बांधणे अपेक्षित असताना एसडब्लूडी विभागाने थुकपट्टी लावण्याचे काम केल्याची चर्चा आता नागरिकांकडून केली जात आहे.  (Latest Marathi News)

भिंत कोसळल्यानंतर नाल्यातून वाहून आलेला १६५ लीटरचा फ्रीज तसेच कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि यासारख्या इतर साहित्यांनी काल सायंकाळी अंधेरी भूयारी मार्गाची पावसाळी पाणी उदंचन करणारी यंत्रणा विस्कळीत करून टाकली. याबाबत माहिती देताना बीएमसीने सांगितले की, मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अवघ्या तासभरात सर्व यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला.

अंधेरी भूयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. अंधेरी भूयारी मार्ग ठिकाणाचा भौगोलिक आकार हा बशीसारखा आहे. या भूयारी मार्गाला लागूनच मोगरा नाला वाहत जातो. मोगरा नाल्याच्या उगम स्थळापासून अंधेरी भूयारी मार्गापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीपर्यंत हा नाला वाहत येतो.

विशेष म्हणजे नाल्याचा हा प्रवाह उगम स्थळापासून अंधेरी भूयारी मार्गाकडे येताना तब्बल १३ मीटरचा उतार आहे. म्हणजेच नाल्याचा प्रवाह हा अत्यंत जोरात येतो. त्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्यास या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणे हे अत्यंत मोठे आव्हान ठरते.

Mumbai News
Mumbai Vile Parle News: मोठी दुर्घटना! विलेपार्ले परिसरात इमारत कोसळली; २ जणांचा मृत्यू

या आव्हानावर मात करण्याकरिता, अंधेरी भूयारी मार्ग परिसरासाठी एकूण तीन ठिकाणी मिळून पाणी उपसा करणारे सहा पंप आणि पूर प्रतिबंधक दरवाजे (फ्लड गेट) यंत्रणा उभारण्यात आली आहे. अंधेरी परिसरातील मिलेनियम इमारत, विरा देसाई मार्ग, अंधेरी भूयारी मार्ग या तीन ठिकाणी ही यंत्रणा उभारली आहे.

ताशी ३ हजार मीटर क्युबिकचे हे सहा पंप तीन ठिकाणी लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले. अतिरिक्त उपाययोजना म्हणून १ हजार मीटर क्युबिकचे २ पंप लावले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही यंत्रणा भर पावसात सुरळीत सुरू रहावी, त्यात कचरा अडकून पंप बंद पडू नयेत, यासाठी नाल्यात पूर्व बाजूला पोलादी जाळी देखील लावली आहे. जेणेकरून तरंगता कचरा रोखून प्रवाह पुढे जाऊ शकेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com