दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Mumbai Mithi Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे कुर्ला, बीकेसीसह अनेक भाग जलमय. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केलं. स्थानिकांनी मिठी नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवलं.
Mumbai rain Kurla
Mumbai rain KurlaSaam Tv News
Published On
Summary
  • मुंबईत मुसळधार पावसामुळे कुर्ला, बीकेसीसह अनेक भाग जलमय

  • मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केलं

  • स्थानिकांनी मिठी नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवलं

  • एनडीआरएफची टीम तैनात, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईसह उपनगरांत पावसाची संततधार सुरू आहे. कुर्ला आणि बीकेसी परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. कुर्ला, तिलकनगर आणि चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात पाणीच पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कुर्ला पुलाजवळील क्रांतीनगर परिसरात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच मिठी नदीत एक तरूण वाहून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिठी नदीत एक तरूण वाहून जाताना दिसून आला आहे. त्याला वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. तसेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

पावसामुळे मिठी नदीचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे. दरम्यान, फुलेनगर भागातील एक तरूण मिठी नदीतून वाहून जाताना दिसून येत आहे. एका दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरूणाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. त्याला वाचवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Mumbai rain Kurla
सोन्याच्या भावाला चकाकी! १० तोळं सोनं ४,३०० रूपयांनी स्वस्त; पाहा आजचे लेटेस्ट दर

मिठी नदीला रौद्ररूप

मुंबईत संततधार सुरू आहे. कुर्लातील मिठी नदी दुथडी वाहत आहे. कुर्ला पुलावरील क्रांती नगर येथे मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. तसेच जवळपासच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग असाच पाऊस सुरू राहिल्यास नदीचं पाणी वस्तीमध्ये शिरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai rain Kurla
क्षुल्लक कारणावरून वाद; माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला, नाशिकमध्ये चाललंय काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com