Mumbai Rain: मुसळधार पावसाचा लोकलला फटका; मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे १० ते २० मिनिट उशिरा

मुसळधार पावसाचा (Rain) फटका लोकल ट्रेनला बसला आहे.
mumbai local train, Mumbai Local Train Update, Mumbai Rain News Update, Mumbai Local Train News
mumbai local train, Mumbai Local Train Update, Mumbai Rain News Update, Mumbai Local Train News Saam Tv

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. या पावसाचा परिणाम आता लोकल ट्रेनवर (Local Train) झाला आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते २० मिनिट उशिरा धावत आहेत. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे रेल्वे पटरीवरही पाणी साचले आहे, त्यामुळे रेल्वेगाड्या धावण्यास उशीर होत आहे. (Mumbai Local Train News)

मुसळधार पावसाचा (Rain) फटका लोकल ट्रेनला बसला आहे. तिनही मार्गावर धावणाऱ्या गाड्या १० ते २० मिनिट उशिरा धावणार आहेत. त्यामुळे सकाळी ऑफीससाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. सर्वच रेल्वेस्थानकांवर गर्दी झाल्याचे दिसत आहे.

mumbai local train, Mumbai Local Train Update, Mumbai Rain News Update, Mumbai Local Train News
प्लास्टिकच्या पाइपमध्ये अर्धवट अडकलेल्या अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवदान

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट'

आयएमडीने पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. (Mumbai Rain News Update)

याशिवाय सातारा जिल्ह्यासाठी ६ ते ८ जुलै आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७ ते ९ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.

mumbai local train, Mumbai Local Train Update, Mumbai Rain News Update, Mumbai Local Train News
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर १८ वर्षांनंतर सत्तांतर; अभिजीत पाटील गटाची सत्ता

कास रात्रीपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरुच आहे. वसई विरार मध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर गुढगाभर पाणी साचल्याने स्कूल बस बंद आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून मधून पावसाच्या सरी, रेड अलर्ट कायम असल्याने प्रशासन सज्ज आहे. (Mumbai Local Train News Today)

हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला असला तरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पावसाची रिपरिप सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com