प्लास्टिकच्या पाइपमध्ये अर्धवट अडकलेल्या अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवदान

अजगरालाच्या शरीरात पाईपची रींग अडकली होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर परिणाम झाला होता.
Maval News
Maval NewsSaam Tv

मावळ : मुंबई- पुणे (Pune) जुन्या महामार्गा लगत हायको कंपनीच्या शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम क्षेत्रात कामगारांना अजगर दिसताच कामगारांची बोबडी वळाली. यावेळी लगेच सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले सर्पमित्र सुनील पुरी आणि योगेश औटी यांनी त्या अजगराला सुरक्षित पकडले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या सरपटणाऱ्या वन्यजीवाच्या शरीरात पीव्हीसी पाईपची रींग अडकली होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर परिणाम झालेला दिसून येत होता.

Maval News
Rain Update Live :राज्यात संततधार सुरुच; धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

या सर्प मित्रांनी या पाइपची रींग काढण्याचा निर्णय घेतला. अजगर आकाराने भला मोठा होता, त्यात ती रिंग कमी आकाराची असल्याने त्याच्या अंगात रूतून बसली होती. रिंग काढत असताना त्याला जखम होण्याची शक्यता होती, मात्र अत्यंत सावधपणे ती रिंग कापून काढली आणि अजगराला त्या संकटातून मुक्त केले.

Maval News
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

या अवस्थेत अजगराला आपले भक्ष्य गिळणेही शक्य होत नसावे असं सर्प मित्रांनी म्हटले. प्राणीमात्रांच्या अधिवासात मानवाने अतिक्रमण केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. त्यात अन्न पाणी शोधण्याच्या नादात जशा गाय वासरांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या जात असतात त्याच प्रमाणे हा अजगर त्या पाईपाच्या रिंगमध्ये अडकला असावा. सर्पमित्रांच्या प्रयत्नाने अजगराला जीवदान मिळाले आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com