Mumbai-Pune Highway Bus Accident: शॉर्टकटसाठी बस 'नो एन्ट्री'मध्ये शिरली, अन् 13 कुटुंब दु:खात बुडाले; अपघातग्रस्त जागेचा इतिहासही भयानक

Mumbai-Pune Highway Bus Accident : बसचा जिथे अपघात झाला खरंतरी येथे वाहनांना नो एन्ट्री आहे.
Pune News Update
Pune News UpdateSaam TV
Published On

Mumbai-Pune Highway Bus Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या गोरेगाव येथील बाजी प्रभू झांज पथकाच्या बसने घेतलेला एक शॉर्टकट 13 जणांच्या जीवावर बेतला आहेत. तर 28 जणांना आयुष्यभर विसरता येणार नाही अशी कटू आठवण देऊन गेला आहे. ड्रायव्हरने शॉर्ट कटचा मोह टाळला असता तर बसने पुण्याहून निघालेले सर्व 41 जण सुखरुप घरी पोहोचले असते.

रेस्क्यू टीममध्ये एका सदस्यांना दिलेल्या माहितीनुसार, या बसचा जिथे अपघात झाला खरंतरी येथे वाहनांना नो एन्ट्री आहे. कोणत्याही वाहनांना येण्यासाठी जाण्यासाठीचा हा रस्ता नाही. परंतु शॉर्टकट आणि लवकर पोहोचण्यासाठी अनेकजण या मार्गाचा वापर करतात. (Latest News)

Pune News Update
Mumbai-Pune Highway Bus Accident: मुंबई-पुणे महामार्गावरील बस अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू, प्रशासनाकडून मृतांची नावं जाहीर

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळील हा रस्ता अतिशय तीव्र वळणांचा असल्याने याठिकाणी अपघातांचं प्रमाण अधिक आहे. म्हणूनच हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र या बसच्या ड्रायव्हरने खुप धोका पत्करुन या ठिकाणी गाडी आणली आणि अपघात झाला. याच ठिकाणी याआधीही पाच ते सहा अपघात झाले आहेत, त्यापैकी हा सर्वात भीषण अपघात आहे, असंही बचाव पथकातील सदस्यांनी सांगितलं. (Bus Accident)

अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 28 जण जखमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याचा कार्यक्रम संपवून माघारी येत असताना हा अपघात झाला.

अपघातील एकूण 13 पैकी 12 मृतांची ओळख पटली आहे. तर एकाची ओखळ पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune News Update
Pune Bus Accident News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

मृतांची नाव

  1. जुई दिपक सावंत (वय 15 वर्ष रा. गोरेगाव)

  2. यश सुभाष यादव (वय 18 वर्ष रा. मुंबई)

  3. स्वप्निल धुमाळ (वय 18 ते 20 रा. मुंबई)

  4. वीर कमलेश मांडवकर (वय 8 रा. गोरेगाव)

  5. वैभवी साबळे (वय 16 वर्ष रा. गोरेगाव)

  6. सतिष धुमाळ (वय 20 रा. गोरेगाव)

  7. मनिष राठोड (वय 23 रा. चेंबर)

  8. हर्षदा परदेशी (वय 19-20 रा. माहिम)

  9. अभय विजय साबळे (वय 20 वर्ष रा. मालाड)

  10. हरीरतन यादव (वय 40 वर्ष रा. जोगेश्वरी)

  11. कृतिक रोहित (गोरेगाव)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com