Mumbai Pune Express Way Traffic : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी; बोरघाटात शेकडो वाहनं एकाच वेळी बंद का पडली?

Mumbai-Pune Expressway: सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी झालीय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीतील बोरघाटात वाहने बंद पडले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात शंभरपेक्षा जास्त वाहने बंद पडली आहेत.
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune ExpresswaySaam Tv
Published On

(दिलीप कांबळे)

Mumbai-Pune Expressway:

सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी झालीय. खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद पडल्याने वाहनांच्या रांग लागलीय. तर मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात शंभरपेक्षा जास्त वाहने बंद पडली आहेत. सलग तीन-चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरीक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मार्गांवर वाहनांची गर्दी झालीय. (Latest News)

ख्रिसमस आणि शनिवार, रविवार या तीन दिवस सुट्ट्या सलग आल्यामुळे मुंबई-पुण्यात वास्तव्याला राहणारे नागरीक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढलीय. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीत बोरघाटात वाहनांची रांग लागली असून येथे शेकडो वाहने बंद पडली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे मोठ्या संख्येने महिला, लहान मुले रस्त्यावर बसून राहिले आहेत. बोरघाटात शेकडो संख्येने प्रवासी वाहने बंद झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे मार्गांवर पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या संख्येने महिला, लहान मुले रस्त्यावर बसून आहेत. नागरीक टोविंग वॅन, मकेनिकच्या प्रतीक्षा करत आहेत.

का बंद पडलीत वाहने

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले आहेत. यामुळे रस्त्यांवर वाहनांची रांग लागलीय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीतील बोरघाटात वाहने बंद पडल्याचं चित्र आहे. मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात शंभरपेक्षा जास्त वाहने बंद पडली आहेत. घाट रस्त्यावर चढाव असल्याने कारच्या क्लचप्लेट गरम झाल्याने वाहने बंद पडली आहेत. घाट रस्तावर चढाव असल्याने वाहनांना पिकअप मिळाला नाहीतर क्लचप्लेटवर लोड येतो. त्यामुळे इंजिन गरम होऊन कार बंद पडल्या आहेत.

हिमाचल वाहतूक

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या सलग आल्यामुळे हिमाचल प्रदेशात पर्यटकांची वर्दळ वाढलीय. सुट्टीच्या दिवशी अनेक लोक डोंगर भागात पर्यटनासाठी आले आहेत. त्याचवेळी कसोलमध्ये पर्यटकांची गर्दी एवढी वाढलीय. वाहनांची गर्दी वाढल्यामुळे वाहतूक मंदावलीय. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

Mumbai-Pune Expressway
Samruddhi expressway accident : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या कारचा समृद्धीवर भीषण अपघात, वाहन चालकाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com