Mumbai Air Pollution : मुंबईची हवा बनली घातक? जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर, पाहा लिस्ट

Most Polluted Cities: मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीलाही मागे टाकले.
Air Pollution
Air PollutionSaam Tv

Mumbai News: मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईची हवा जगभरातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir नुसार, 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीलाही मागे टाकले.

तज्ज्ञांच्या मते, कार, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांमधून सतत होणारी धूळ आणि धूर हे हवेची गुणवत्ता ढासळण्याचे मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त, अरबी समुद्रातील ला निना प्रभावाने पश्चिम किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग कमी केला आहे, ज्यामुळे प्रदूषण पसरण्यास मदत झाली आहे.

Air Pollution
Satyajeet Tambe Tweet: "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी", सत्यजित तांबेंच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय?

NEERI आणि IIT-B च्या 2020 च्या अभ्यासानुसार, मुंबईच्या हवेतील कणांच्या भारांपैकी 71% पेक्षा जास्त रस्ते किंवा बांधकामांचा वाटा आहे. उर्वरित प्रदूषण औद्योगिक आणि ऊर्जा युनिट्स, विमानतळ आणि कचरा डंपमधून होते. (Mumbai News)

मुंबईत श्वसनाचे आजार वाढले

यामुळे मुंबईत श्वसनाच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दोन दशकांपूर्वी फुफ्फुसावर काही वेळा काळे डाग दिसत होते. हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान, वायुप्रदूषणाने प्रभावित फुफ्फुस नियमितपणे पाहिले जातात. काळे फुफ्फुस किंवा स्पॉटी फुफ्फुसे देखील धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये आढळतात.

Air Pollution
Cabinet Decision : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठी घोषणा; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

जगभरातील सर्वात प्रदूषित टॉप 10 शहरं

  1. लाहोर (पाकिस्तान)

  2. मुंबई (भारत)

  3. काबूल (अफगाणिस्तान)

  4. काओशुंग (तैवान)

  5. बिश्केक (किर्गिस्तान)

  6. अक्रा (घाना)

  7. क्राको (पोलंड)

  8. दोहा (कतार)

  9. अस्ताना (कझाकस्तान)

  10. सॅंटियागो (चिली)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com