
Saif Ali Khan attack case : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांना मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी पोलिसांनी एका आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक केली होती. रात्री दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. खार पोलीस स्टेशनमध्ये सध्या आरोपी आहे. त्याची चौकशी केली जात आहे.
सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसाच्या विशेष पथकाने ठाण्यात धडक कारवाई केली. पोलिसांनी ठाण्यातून विजय दास या युवकाला बेड्या ठोकल्या. ठाण्यातील घोडबंदर रोड वरील हिरानंदानी इस्टेट येथील लेबर कॅम्पमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे समजतेय.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा संयुक्त कारवाई केली आहे. सदरचा युवक याआधी पबमध्ये कामाला होता, अशी माहिती देखील समोर आलो आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी विजय याला सध्या खार पोलीस ठेवलेय, त्याची चौकशी करण्यात येत आहे.
वांद्रे येथे दोन दिवसांपूर्वी सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला होता. दोन जण चोरीच्या उद्देशाने घरात घुसले होते. त्यांच्यामध्ये आणि सैफ यांच्यात झटापटी झाली होती. दोघांनी सैफ अली खान याच्यावर चाकूने आणि धारधार शस्त्राने हल्ला केला होता. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्यात. सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे. त्याला दोन दिवसांत रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येणार आहे. पोलिसांनी सैफवरील हल्ल्याचा तातडीने तपास करत दोन्ही आरोपीला अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ते चोरीच्या इराद्यानेच घरात घुसले होते की दुसरा काही कट होता? याचा तपास सुरू आहे.
आरोपी बांगलादेशी घुसखोर?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आपले नाव विजय दास असल्याचे सांगितले. पण मिळालेल्या माहितीनुसार, त्याला खाकी दाखवल्यानंतर त्यानं आपलं खरं नाव सांगितले. मोहम्मद अलियान असे आरोपीचे नाव आहे. तो बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. बांगलादेशी घुसखोर असल्यास या प्रकऱणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.